Twitter Legal Team Dials Elon Musk | Elon Musk यांना Twitter ने पाठवली लीगल नोटिस, डील कॅन्सल होणार का ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Elon Musk आणि Twitter डीलवरून सतत वाद होत आहेत (Twitter Legal Team Dials Elon Musk). आता एलॉन मस्क यांनी दावा केला आहे की ट्विटरच्या कायदेशीर टीमने त्यांना नोटीस दिली आहे. हे प्रकरण बनावट ट्विटर अकाउंट आणि बोट्सशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. (Twitter Legal Team Dials Elon Musk)
नॉन – डिस्क्लोजर अॅग्रीमेंट (NDA) चे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे मस्क यांनी सांगितले. तत्पूर्वी, मस्क म्हणाले की, ट्विटर विकत घेण्याची 44 बिलियनची डील ते तात्पुरती स्थगित करत आहे.
Elon Musk यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ट्विटर लीगल टीमने तक्रार केली आहे की त्यांनी नॉन – डिक्लोजर अॅग्रीमेंटचे उल्लंघन केले आहे. त्यांनी बोट चेक सॅम्पल साईज सार्वजनिकपणे सांगितली आहे. ट्विटर डील होल्डवर ठेवल्यानंतर, मस्क म्हणाले होते की त्यांची टीम ट्विटर अकाऊंटच्या 100 फॉलोअर्सचे रँडम सॅम्पल घेईल. (Twitter Legal Team Dials Elon Musk)
सॅम्पल साईज सांगितल्याने नोटीस
एलॉन मस्क ट्विटरवरील बोट्स किंवा बनावट अकाऊंटबद्दल अगदी स्पष्ट आहेत. ते म्हणाले की कोणतीही सेन्सिबल रँडम सॅम्पल प्रोसेस ठीक आहे. ते म्हणाले की ते सॅम्पल साईज 100 ठेवत आहेत कारण ट्विटर याच साईजवरून बनावट / स्पॅम / डुप्लिकेट खात्याची गणना करते.
—
मस्क यांच्या ट्विटर डीलच्या घोषणेनंतर ते सतत चर्चेत आहेत.
अशी शक्यता वर्तवली जात आहे की, ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक बडे चेहरे कंपनी सोडतील.
यामध्ये कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्या नावाचाही उल्लेख केला जात आहे.
मात्र, ट्विटरचा पुढील सीईओ कोण होणार याबाबत कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही.
पराग अग्रवाल यांनीही नुकतेच ट्विट करून कंपनीच्या चांगल्या भविष्यासाठी सतत काम करत राहीन असे सांगितले.
या डीलनंतर दोन अधिकार्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे.
आतापर्यंत, डील रद्द करण्याबद्दल काहीही सांगितले गेलेले नाही.
परंतु, कंपनी किंवा मस्क यापैकी कोणीही या डीलमधून माघार घेतल्यास त्याला 1 बिलियन डॉलरचा दंड भरावा लागेल.
Web Title :- Twitter Legal Team Dials Elon Musk | elon musk says twitter legal team told him he violated an nda
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update