LokSabha Election 2019 : ट्विटरवर एका दिवसात ‘एवढ्या’च युजर्सना करता येणार फॉलो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीय प्रचारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावशाली माध्यम बनले आहे.सोशल नेटवर्किंग साइटपैकी व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ट्विटरवरवर सर्वात जास्त प्रचार होताना दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये महत्वाचे बदल केले आहेत. आता कोणतीही व्यक्ती एका दिवसात ४०० हून अधिक युजर्सना फॉलो करू शकणार नाही अशी घोषणा केली आहे. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. याआधी ही मर्यादा १००० होती. ट्विटरच्या सुरक्षा टीमने एक ट्वीट करून नवीन नियमांची माहिती दिली आहे.

ट्विटरचा नवीन नियम
नवीन नियमाविषयी माहिती देताना ट्विटरने ट्विट केलं आहे. कोणताही ट्विटर युजर एका दिवसांत ४०० हून अधिक नव्या हँडल्सला फॉलो करू शकणार नाही. एका दिवसांत तुम्ही फॉलो करू शकणाऱ्या अकाऊंटची संख्या आम्ही १००० वरून ४०० वर आणली आहे. तसेच स्पॅम संदेशावर नियंत्रण आणल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही अशी माहिती ट्विटरने दिली आहे.

ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन, क्रीडा, राजकारण तसेच जगात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी आधी ट्विटरवर येतात. यामुळे ट्विटर सोशल मीडियाचे महत्वाचे माध्यम बनले आहे.