Twitter वर शिवसेनेची ‘टिंगल’, ट्रेंड‍ झालं ‘तुमसे ना हो पाएगा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल महाराष्ट्राच्या राजकारणात फार महत्वाचा दिवस दिवस होता. दुपारपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शिवसेना सहज सरकार स्थपन करणार असे वाटत असताना संध्याकाळपर्यंत हे चित्र स्पष्ट होत नव्हते. शिवसेनेला संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सत्तास्थापनेची मुदत देण्यात आली होती, मात्र या वेळेत शिवसेना बहुमताचा आकडा जमा करू शकली नाही. त्यानंतर आता राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जर त्यांनी देखील असमर्थता दर्शवली तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर ट्व‍िटरवर #TumSENAhoPayega हे ट्रेण्डिंगमध्ये होते. नेटकऱ्यांनी शिवसेनेची चांगलीच टिंगल केली. एका युझरने एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये शिवसेना सत्तास्थापनेची मदत मागण्यासाठी राष्ट्रवादीकडे जाते, राष्ट्रवादी त्यांना काँग्रेसकडे घेऊन जाते, ज्यावेळी शिवसेनेला सत्तेचे फळ मिळणार असते त्याचवेळी राष्ट्रवादी त्यांचा पाठिंबा काढून घेते.

तर एकाने म्हटले आहे कि, शिवसैनिकांची परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून त्यांची आता भूमिगत होण्याची वेळ झाली आहे. तर एकाने म्हटले आहे कि, शिवसेनेसोबत प्रॅन्क करण्यात आला आहे.शिवसेनेने राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी ती फेटाळली. मात्र सध्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणितांमध्ये अडकून पडली आहे.

दरम्यान, राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर काँग्रेसला 44 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like