#SareeTwitterचा ‘इम्पॅक्ट’, प्रियंका गांधीनेही शेयर केला २२ वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सोशल मीडियाच्या दुनियेत रोज एक नवीन ट्रेंड चालतो, त्यामध्ये सामान्य माणसापासून ते व्ही.आय.पी. माणसांपर्यंत सर्व लोक सहभागी होतात. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटर वर एक नवीन ट्रेंड चालू आहे #SareeTwitter, ज्यामध्ये महिला साडी घालून आपले फोटो शेयर करत आहेत. या ट्रेंड मध्ये काँग्रेसची महासचिव प्रियंका गांधी वाड्रा पण सहभागी झाल्या आहेत. त्यांनी बुधवारी सकाळी साडी घालून फोटो शेयर केला आहे. प्रियंकांचा हा फोटो त्यांच्या लग्नातला आहे. त्या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले की, ”२२ वर्षापूर्वी माझ्या लग्नाच्या दिवशी सकाळी पूजा”. त्यासोबतच त्यांनी #SareeTwitter देखील वापरले. प्रियंका गांधींचे लग्न १८ फेब्रुवारी १९९७ ला कारोबारी रॉबर्ट वाड्रा सोबत झाले.

प्रियंका गांधी वाड्रा ट्विटर नेहमी ऍक्टिव्ह असतात, मग कधी कधी त्या सरकारवर निशाण साधत असतात. एखाद्या मुद्यावर ट्विट करणे असो किंवा एखाद्या उत्सवा निमित्त लोकांना शुभेच्छा देणे असो, प्रियंका नेहमीच ट्विटरवर आपली उपस्थित दर्शवीत असतात.

ट्विटरवर दोन दिवसांपासून हा ट्रेंड चालू आहे त्यामध्ये चित्रपटातील स्टार, नेता, अधिकारी, पोलीस ऑफिसर असो सगळ्यांनीच साडी घालून फोटो शेयर केले आहेत आणि पुरुषांकडून ट्विटरवर #KurtaTwitter ट्रेंड चालू आहे. काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील साडी घालून काही फोटो शेयर केले आहेत. साडी ट्विटरच्या प्रतिसादात मुंबई पोलिसांकडून #KhakiSwag ट्रेंड चालू आहे. त्यामध्ये पोलीस वर्दी मध्ये आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like