भारताच्या विरोधात सदैव ‘टिव-टिव’ ! PAK च्या 200 नागरिकांची अकाऊंट ‘ट्विटर’कडून ‘सस्पेंड’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानी नागरिक, प्रशासकीय अधिकारी भारताविरोधात सोशल मिडियावर गरळ ओकत आहे. पाकिस्तानमधील नागरिक ट्विटरवरुन अनेक भडकावू वक्तव्य करत आहेत जी आक्षेपार्ह आहे. यामुळे ट्विटरने तब्बल २०० पाकिस्तानी ट्विटर अकाऊंट सस्पेंड केले आहे. पाकिस्तानी भारतातील काश्मीर मुद्यावर ट्विटरवरुन टीका करत होते.
पाकिस्तानमधील अनेकांच्या ट्विटर अकाऊंटला सस्पेंड करण्यात आले आहेत. यावर पाकिस्तानी सरकारने निषेध नोंदवला आहे. परंतू याचा कोणताही फायदा झाला नाही. पाकिस्तानच्या अनेक पत्रकार, समाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकारी याशिवाय लष्कारातील सैन्य अधिकारी यांच्या ट्विटर अकाऊंटचा सस्पेंड केलेल्या ट्विटर अकाऊंटमध्ये समावेश आहे.
#stopsuspendingpakistanis चा ट्रेंड
यावर पाकिस्तान नागरिकांना आता #stopsuspendingpakistanis चा ट्रेंड सुरु केला आहे. अनेक सरकारी अधिकाऱ्यांचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहेत. अनेक मंत्रालयाचे ट्विटर हँडल देखील सस्पेंड करण्यात आले आहेत.
पाकच्या इंटर सर्विस पब्लिक रिलेशनचे मॅनेजर जनरल आसिफ गफ्फूर यांनी ही माहिती देत सांगितले की ट्विटर आणि फेसबूकवर भारत व्याप्त काश्मीरवर टिप्पणी करणाऱ्या पाकिस्तानींचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. यावर त्यांनी नाराजी देखील जाहीर केली आहे. अखेर पाकच्या पंतप्रधान कार्यालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. परंतू ट्विटरने भारताविरोधात टीका करणाऱ्या ट्विटर हँडलला फ्री केले नाही. पाकच्या पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटरच्या स्थानिक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.
- कारल्याची पाने अनेक आजार करतात गायब, ‘हे’ उपाय करून पहा
- दिवसभरात ‘या’ ७ चुकांमधून केली एक चुक, तर होऊ शकतो ‘डायबिटीज’
- तरूणांनो, हँडसम दिसायचेय ? …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ
- झोपण्याआधी चुकुनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणाम
- गव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय
- वयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन ? आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण
- रोज ठेवा फक्त ५ मिनिटे मौन, चुटकीसरशी गायब होईल मानसिक ताण
- दिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका ! वेळीच घ्या काळजी
- ‘हे’ ४ पदार्थ अजिबात खावू नका, गळू शकतात केस, वेळीच घ्या खबरदारी
- सौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या