ट्रेंड ! UN मध्ये ट्रम्प यांचे भाषण अव्वल, इम्रान खान 2 तर PM मोदी 5 व्या स्थानी

न्यूयार्क : वृत्तसंस्था – संयुक्त राष्ट्राच्या महासभेत झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण ट्विटरवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे तर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान दुसर्‍या क्रमांकावर आहेत तर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण पाचव्या क्रमांकावर आहे.  संयुक्त राष्ट्राच्या महासभेत झालेल्या भाषणावरून ट्विटरवर युजर्सनी आपली मते व्यक्त केली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत एका ट्विटर युजरने  लिहिले आहे  की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दहशतवादाविरूद्धचे भाषण सदैव लक्षात ठेवले जाईल. पाकिस्तानचा उल्लेख न करता पाकिस्तानवर निशाणा साधताना ए. प्राचीन तामिळ कवीचा उल्लेख करत दहशतवादाविरूद्ध  त्यांनी कठोर संदेश दिला. दुसर्‍या युजरने लिहिले आहे की, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ट्रम्प यांचे भाषण पाहणे आणि ऐकणे विचित्र होते.

इम्रान खानची खिल्ली

एका ट्विटर युजरने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबाबत  लिहिले आहे की, ‘1.इम्रान यांचे भाषण केवळ तीन वाक्यांमध्ये होते.  मला पैसे हवे आहेत. 2. मी  तुला परत देणार नाही.  3. मी जगाचा नाश करीन.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत झालेल्या भाषणादरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारतीय पंतप्रधान मोदींना ‘पंतप्रधान’ ऐवजी ‘राष्ट्रपती’ म्हणून संबोधल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवली गेली. एका ट्विटर युजरने ट्विट केले आहे की, ‘इम्रान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर इतका घाबरले आहेत की त्यांनी मोदींना भारताचे राष्ट्रपती केले.’ दुसर्‍याने लिहिले, ‘मोदी आता भारताचे नवे राष्ट्रपती आहेत.’ इम्रान खान यांनी आपल्या संबोधनात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आणि भारताला लक्ष्य केले. याउलट पंतप्रधान मोदींनी जगाला एकता आणि दहशतवादाविरूद्ध शांततेचा संदेश दिला.

काय म्हणाले पीएम मोदी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनात दहशतवादाविरोधात आवाज उठवताना म्हटले की, भारताने जगाला ‘युद्धाचा’ नाही तर बुद्धांचा शांततेचा संदेश दिला. जेव्हा आपण जगाला दहशतवादाविरूद्ध सतर्क करतो, तेव्हा आपल्या आवाजामध्ये केवळ गांभीर्यच नसते, तर संताप देखील असतो. पंतप्रधानांनी भारतातील दहशतवादी घटनांबाबत पाकिस्तानने पाठिंबा दर्शविलेल्या घटकांच्या वतीने अप्रत्यक्षपणे संताप व्यक्त केला.  मानवतेसाठी दहशतवादाविरोधात जगाने एकत्र होण्याचे आवाहन त्यांनी केले.

Visit : Policenama.com