Farmers Protest : भारताच्या इशाऱ्यानंतर ट्विटरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियापैकी एक असलेल्या ट्विटरचे कोट्यवधी युजर्स जगभरात आहेत. या युजर्सकडून अनेक विषयांवर ट्विट केले जाते. पण याच ट्विटमुळे गेल्या काही दिवसांपासून वादंग निर्माण होत आहे. त्यानंतर भारताने ट्विटरला इशारा दिला होता. याच इशाऱ्यानंतर ट्विटरने मोठा निर्णय घेतला आहे.

भारत सरकारच्या माध्यमातून ‘फक्त भारतात’ काही अकाउंट बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही अकाउंटवर बंदी आणण्यात आली. ट्विटरने याबाबत सांगितले, की समाजातील कार्यकर्ते, राजकारणी आणि मीडियाच्या ट्विटर हँडलला ब्लॉक केले गेले नाही. कारण असे करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन होऊ शकते. पण काही अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत.

तसेच आम्ही युजर्सच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांचे समर्थन सुरुच ठेवणार आहोत. त्यासाठी सक्रियतेने भारत सरकारच्या कायद्यानुसार उपलब्ध पर्यायांवर विचार करू, असेही ट्विटरकडून सांगण्यात आले.

काय आहे भारत सरकारचा आदेश ?
दरम्यान, सरकारने ट्विटरचे असे काही अकाउंट बंद करण्यास सांगितले, की जे कथितरित्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर भडकावू सूचना देत आहेत. मात्र, सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

ब्लॉगपोस्टवर ट्विरने म्हटले की…
वादग्रस्त पोस्ट दिसल्यास किंवा त्यासंबंधी हॅशटॅग सारखे काहीही आढळल्यास हे थांबविण्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात ट्विटरने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडेही माहिती दिले आहे.