4 दिवसांपूर्वी ‘त्यानं’ मुख्यमंत्र्यांना दिला होता ‘सल्ला’, ‘सेम-टू-सेम’ झाला हैदराबाद ‘एन्काऊंटर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबाद बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. घटनास्थळी आरोपींना पोलिसांनी तपासासाठी नेले असताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात झालेल्या चकमकीत चारही आरोपी ठार झाल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली. यानंतर सोशल मिडियावर प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांचे समर्थन देखील होत आहे तर दुसऱ्या बाजूला आरोपींना कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी होती असेही बोलले जात आहे.

आता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ट्विटरवर चार दिवसांपूर्वी एका यूजरने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. यात यूजर्सने जो सल्ला दिला होता अगदी त्याच प्रमाणे एन्काऊंटर झाल्याची चर्चा आहे.

पोलीस आयुक्त सज्जनार म्हणाले की, आरोपींनी हा गुन्हा कसा केला आहे याविषयी विचारत असताना त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना शरण जायला सांगितले होते तरीही ते थांबले नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी ही माहिती दिल्यानंतर चर्चा झाली यूजरने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याची. यात यूजरने म्हणले होते आरोपींना घटनास्थळी नेऊन तिथे काय झाले ते विचारावे. तेव्हा ते पळून जायचा प्रयत्न करतील त्यावेळी गोळ्या घाला. आता संबंधित अकाउंट डिलीट करण्यात आले आहे. मात्र, त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काय हे प्रकरण –
हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला. आरोपींना फाशी देण्यात यावी अशा मागणी करण्यात येत होती. परंतू त्या रात्री काय घडलं त्याचा एक एक खुलासा नंतर समोर येत आहे.

4 नराधमांनी 25 वर्षीय महिला डॉक्टवर 27 नोव्हेंबरला सामूहिक बलात्कार आणि हत्या केली. त्यानंतर महिलेचे मृत शरीर जाळण्यात आले. याआधी महिला डॉक्टरने शेवटचा कॉल आपल्या बहिणीला केला होता.

महिला डॉक्टरच्या बहिणीने घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, दीदीने रात्री 9.20 च्या सुमारास फोन केला होता आणि सांगितले होते की तिची गाडी पंक्चर झाली आहे. जे लोक तिची मदत करण्यासाठी पुढे आले होते, ते संशयास्पद वाटत आहेत. मी तिला फोन बंद करू नको आणि माझ्याशी बोलत रहा असे सांगितले. पण, फोनची बॅटरी कमी असल्यामुळे आमचा संपर्क तुटला. त्यानंतर जे काही घडले त्याने मी हादरले आहे. असे घाणरडे कृत्य कोणासोबतही होऊ नये असे ही मृत महिलेच्या बहिणीने सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like