‘पतंजली’ची डोकेदुखी वाढली ! Twitter वर बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहानं कोविड 19 आजारावर कोरोनिल या आयुर्वेदीक औषधाची घोषणा केली होती. हे औषध कोरोना रुग्णांना ठणठणीत बरं करतं. त्याची यशस्वी चाचणीही आपण घेतली आहे असा दावाही बाबा रामदेव यांनी केला होता.

कोरोनिल लाँचिंगपासूनच वादाऱ्या भोवऱ्यात सापडलं आहे. यानंतर आता पुन्हा एकदा पतंजलीचं टेन्शन वाढलं आहे. बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी ट्विटरवरून सुरू झाली आहे. WHO च्या नावानं फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपरिक उपचारांना परवानगी दिलेली नाही. अशा उपचारांचा दावा करत असलेल्या कोणत्याही संस्थेला सर्टिफिकेट दिलेलं नाही असं म्हटलं आहे. पतंजलीनं औषध लाँच केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती समोर आली आहे. यात दिसून आलंय की, WHO च्या सर्टीफिकेशन स्किमअंतर्गत आयुष मंत्रालयाचं सर्टीफिकेट मिळालं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाई रिजनल अधिकाऱ्यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, कोरोनाच्या औषधाचं जागितक आरोग्य संघटनेकडून सर्टीफिकेशन करण्यात आलेलं नाही.

रामदेब बाबा यांनी अशी घोषणा केली होती की, पतंजलीच्या कोरोनलि टॅबलेटमुळं कोविडवर उपचार होतील. आयुष मंत्रलयानं कोरोनिल टॅबलेटला एक सहायक औषध म्हणून मंजुरी दिली. त्यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते.

अनेकांनी आता जागतिक आरोग्य संघटनेच्या ट्विटच्या आधारे बाबा रामदेव यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. माजी आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

रामदेव बाबांनी याआधीही कोरोनाचे उपचार शोधण्याचा दावा केला होता. त्यामुळं रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. म्हणून या औषधाला बुस्टर असं म्हटलं होतं. आता रामदेव बाबांनी कोरोनिलला CoPP-WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टीफिकेशन सिस्टीमनुसार सहाय्यक औषध घोषित केलं आहे.

पतंजलीकडून असा दावा केला जात आहे की, या औषधाच्या वापरामुळं 70 टक्के रुग्ण हे 3 दिवसात बरे होतील. मात्र कोरोनिल हे वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. आता यामुळं बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. एका हिंदी वेबसाईटनं देखील याबाबत वृत्त दिलं आहे.