‘ना शिव – ना राज’मध्ये तुम्ही तर ‘व्यापम’च्या इतिहासामध्ये : जयवर्धन सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी सीएए विरोधात भाष्य करताच भाजपने त्यांच्यावर पलटवार केला आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटवरून टीका करताच काँग्रेस देखील आक्रमक झाली. एमपी सरकारमध्ये मंत्री असलेले जयवर्धने सिंह यांनी ट्विट करत म्हंटले की, आता तुमचे सरकार नाही ते तर जुन्या इतिहासात आहे. थोडी वाट पहा.

मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानंतर भाजपने म्हंटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी काँग्रेसने आपले ब्रम्हास्त्र काढले आहे.

कोणत्याही प्रकारची कुर्बानी देण्यासाठी तयार : अय्यर
मंगळवारी दिल्लीतील शाहीन बाग येथे आंदोलकांमध्ये दाखल झालेल्या मणिशंकर अय्यर यांनी म्हटले होते की पाहुयात कोणाचे हात बलवान आहेत आमचे की खुन्यांचे. शाहीन बागेत मणिशंकर अय्यर म्हणाले, ‘मी तुमच्यासाठी जे काही करू शकेल ते करण्यास तयार आहे. मी तुमच्या सर्वांसमोर वचन देतो. तुम्हाला जो काही पाठिंबा दयायचा आहे त्यासाठी मी तयार आहे आणि जी काही कुर्बानी द्यावी लागले ती देण्यास मी तयार आहे. आता बघा कोणाचा हात मजबूत आहे, आमचा की त्या खुन्यांचे ? अशा शब्दात अय्यर यांनी मोदी शहा यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाण साधला होता.

शिवराज यांची अय्यर यांच्यावर टीका ‘
याच वक्तव्याच्या आधारावर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणतात, खोटारडे जोर जोरात येऊन गोंधळ करून गेले,प्रत्येक खऱ्या माणसाला स्वतःचा खुनी असल्याचे सांगून गेले. जो ना ‘मणी’ आहे, ना कधी होता ‘शंकर’ आणि आपला उद्धटपणा सगळ्यांना दाखवून गेला. अशा प्रकारचे ट्विट चौहान यांनी केले आहे.

शिवराज सिंह यांच्यावर जयवर्धन सिंह यांचा पलटवार
शिवराज सिंह यांच्यावर जयवर्धन सिंह यांनी पलटवार करत एक ट्विट केले ज्यामध्ये ते म्हणतात, ना तो ‘शिव’ मध्ये आहे ना ‘राज’ मध्ये, तुम्ही केवळ व्यापम इतिहासामध्ये आहात. . थोडी वाट पहा.

काय आहे व्यापम घोटाळा
व्यापम बाबतचा मोठा खुलासा सात जुलै 2013 ला पहिल्यांदा पीएमटी परीक्षेदरम्यान झाला होता. जेव्हा एका टोळीला गुन्हे शाखेने पकडले होते. ही टोळी पीएमटी परीक्षेमध्ये बनावट विद्यार्थ्यांना बसवण्याचे काम करत होता. तेव्हाचे मुखमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ऑगस्ट 2013 मध्ये हे प्रकरण एसटीएफच्या हवाले केले होते.

हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली आणि एप्रिल 2014 मध्ये हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली, ज्याच्या देखरेखीखाली एसटीएफ चौकशी करत राहिले. 9 जुलै 2015 रोजी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 15 जुलैपासून सीबीआयने तपास सुरू केला.

सरकारमधील माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा त्यांचे ओएसडी असलेले ओपी शुक्ल भाजप नेता सुधीर शर्मा, राज्यपाल के ओएसडी असलेले धनंजय यादव, व्यापमं चे नियंत्रक राहिलेले पंकज त्रिवेदी, कंप्यूटर एनालिस्ट नितिन मोहिंद्रा याना याप्रकरणी जेलची हवा खावी लागलेली आहे. या प्रकरणात दोन हजारांपेक्षा अधिक लोक जेलमध्ये गेलेले आहेत तर चारशे हुन अधिक जणं फरार आहेत. तर 50 हुन अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/