‘त्या’ फोटोमुळे सारा अली खानला करावा लागत आहे ट्रोलिंगचा सामना 

मुंबई : वृत्तसंस्था – ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’सारख्या चित्रपटात झळकलेल्या सारा अली खानची सध्या सर्वत्र चर्चा होत असते .केवळ दोन चित्रपटताच साराने आपला चाहता वर्ग तयार केला आहे. सोशल मीडियावरही तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. हीच सारा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर साराला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

सारा अली खान नुकतीच एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली. या मॅगझिनसाठी साराने फोटो शूट केले होते. या फोटो शूटचे काही फोटो साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत शेअर केले. पण तिचे हे फोटो चाहत्यांना अजिबात आवडले नाही. या फोटोशूटनंतर चाहत्यांकडून कौतुक होण्या ऐवजी सारा ट्रोल होत आहे. याचे कारण आहे साराच्या मागे उभा असलेला आफ्रिकन पुरूष.

होय, साराच्या फोटोशूटच्या एका फोटोत तिच्यामागे एक आफ्रिकन व्यक्ती उभा आहे. या उंचपु-या आफ्रिकन व्यक्तिसोबत साराने अतिशय आत्मविश्वासाने पोज दिली असल्याचे दिसत आहे. पण या फोटोत एक घोळ आहे. हा घोळ साराला दिसला नाही. पण नेटकऱ्यांच्या मात्र तो लक्षात आला आहे. या फोटोत साराची सावली दिसतेय. पण तिच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तिची सावली मात्र नाही. नेमकी हीच गोष्ट युजर्सला खटकली आणि त्यांनी साराला ट्रोल केले.

हा फोटो फोटोशॉप असल्याचा दावा काही युजर्सनी केलाआहे .लोकांनी फक्त सारालाच नाही तर संबंधित मॅगझिनला सुद्धा ट्रोल केले आहे. इतकी खराब एडिटींग करायची होती, तर आम्हीच करून दिली असती, असे एका युजरने लिहिले. आफ्रिकन व्यक्तिला एका वस्तूप्रमाणे वापरून त्याच्या संस्कृतीचा अपमान केल्याची टीकाही काहींनी केली आहे.