अफगाणिस्तानमधील हेल्मंड येथे दोन सैनिकी विमानांमध्ये ‘टक्कर’, 15 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तान (Afghanistan) मधील दक्षिणी हेल्मंड (Southern Helmand) च्या नवा जिल्ह्यात अफगाण हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली. टोलो न्यूजच्या म्हणण्यानुसार, या अपघातात किमान 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की ही घटना हेलिकॉप्टर द्वारे कमांडोजना परत आणण्याच्या आणि जखमी सुरक्षा दलांना घेऊन जाण्याच्या दरम्यान झाली. एका अन्य सूत्रांनी सांगितले की या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान संरक्षण मंत्रालयाने या घटनेवर कोणतेही भाष्य केलेले नाही.

प्रांताचे प्रवक्ते ओमर झवाक यांनी पुष्टी केली आहे की नवा जिल्ह्यात एक घटना घडली आहे, परंतु त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.