भारतीय वायुसेनेच्या दोन विमानांचा अपघात

बेंगळुरू : कर्नाटक वृत्तसंस्था – भारत देशावर संकटांचे सावट गडद असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. कारण देशात नजीकच्या काही दिवसात ५० हुन अधिक लष्करी जवान शहीद झाले आहेत. देशावर दहशतवाद्यांचे सावट असल्याच्या बातम्या गुप्तचर विभागाकडून येत आहेत. आशातच भारतीय वायुसेनेच्या दोन विमानांचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एयरोबैटिक्स टीमची दोन विमाने आपसात धडकल्याने हा अपघात झाला आहे. एयरो इंडिया शोसाठी सराव करत असताना हा अपघात झाला आहे असे वृत्त समोर आले आहे.

या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच दोन्ही विमानाचे वैमानिक सुरक्षित रित्या विमानातून बाहेर आले आहेत. त्यामुळे मोठा धोका टळला आहे. वायुसेनेच्या विमानांचा सराव बेंगळुरू येथील येलाहांका एअरबेस वर सुरु होता. दोन्ही वैमानिक अपघातानंतर सुरक्षित रित्या बाहेर पडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.