लष्करात भरतीच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक करणार्‍या आर्मीतील 2 जवानांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सैन्यात भरती करुन देतो असे सांगत बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या सैन्यातील दोन जवानांना अटक केल्याचा दावा करण्यात आला आहे. यात रोहित कुमार पाण्डेय आणि रंजीत सिंह या दोन जवानांना अटक केली असल्याचे उत्तर प्रदेश एसटीएफने सांगितले आहे.

अटक केलेल्या आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितले की ते दोघे सैन्यात शिपाई आहेत आणि मित्र देखील आहेत. जेव्हा लखनऊ आणि बीआरओ अमेठीमध्ये भरती होती तेव्हा मेडिकलमध्ये टेम्पररी अनफिट उमेदवारांची रिमेडिकल कमांड हॉस्पिटल लखनऊमध्ये होते. हे आरोपी हॉस्पिटलच्या परिसरात राहतात. आरोपी म्हणाले की उमेदवार मेडिकलसाठी आलेले असतात तेव्हा आमचे त्यांच्यांशी बोलणे होत असे.

आम्ही त्यांना मेडिकल पास करुन देऊ असे सांगत. त्यातील काही उमेदवार पास होत असत तर आम्ही त्यांना सांगत की आम्ही तुमची भरती देखील करुन देऊ. आम्ही त्यांच्याकडून त्यांचे मूळ प्रमाणपत्र आणि काही पैसे घेत असत आणि त्याचे नाव मेरिटमध्ये आल्यानंतर त्याचे मूळ प्रमाण पत्र परत देत होतो. त्यातील काही उमेदवार स्वत:च पास होत असतं परंतु आम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊन मग त्यांना मूळ कागदपत्र परत देत होतो. ज्याची नाव मेरिट लिस्टमध्ये येत नसे त्यांना पुढील भरतीसाठी प्रयत्न करा असे सांगून काही रुपये आम्ही ठेवून आणि काही परत करुन त्यांना त्यांची मूळ कागदपत्र परत करत होतो.

https://tarunmitra.in/archives/246999