कर्मचार्‍यांशी वाद घालणारे दोघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कारवाई केल्यानंतरही पुन्हा गाडी लावून व्यवसाय केल्याने साहित्य उचलून नेत असलेल्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांशी वाद घालून टेम्पो अडवून वाद घातल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आल्ताफ इस्माईल शेख (३२, पाटील इस्टेट, मुळ रा. बिहार), देवा जियाराम पटेल (२७, पुणे स्टेशन, मुळ रा. लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक राजू लोंढे (३४, चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे.

यानूसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी हे महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत. त्यांनी पुणे एसटी स्टॅण्ड पार्सल विभागाजवळील अनधिकृत वडापावच्या गाडीवर कारवाई करुन ती बंद केली होती. मात्र, आरोपींनी कारवाईनंतर पुन्हा टेबल लावून व्यवसाय सुरु केला. यानंतर शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास फिर्यादी यांनी आरोपी यांचे साहित्य ताब्यात घेऊन अतिक्रमण विभागाच्या टेम्पोमध्ये टाकले. यावेळी आरोपींनी आरडाओरडा करुन टेम्पो अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच, टेम्पो चालकाला खाली उतरवून ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.  पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. एम. पाटील करत आहेत.

Visit : Policenama.com