माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणारे दोघे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खराडीतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील कंत्राटदारांना माथाडी य़ुनियनच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

मेहबुब जैनुद्दीन सरकुले (४३, चंदननगर) व मच्छिंद्र बजरंग सदाफुले (५०, खऱाडी) अशी अटक कऱण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खऱाडी परिसरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील टॉवर क्रमांक ४ मधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रेडब्रिक कंपनीकडून व्यावसायिक कामासाठी लागणाऱ्या सुविधा पुरविण्याचे काम २७ जानेवारी पासून सुरु झाले. त्यावेळी कंपनीचे सुपरवायजर अभिजीत कडलक यांनी त्यांच्या कंपनीतर्फे कामाला सुरुवात केली होती. कंपनीसाठी लागणारे सामान, प्लायवुड, केबल, एअर कंडीशन असे साहित्य ट्रक व टेम्पोने तेथे आणले जात होते.

त्यावेळी तेथील माथाडी युनीयनचे काम करणारे महेबुब सरकुले व मच्छिंद्र सदाफुले हे दोघे युनीयनच्या नावाखाली त्या वाहनांमधील माल खाली करण्यासाटी दुप्पट रक्कम मागत होते. त्यामुळे याबबात कंपनीने सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहायक पोलीस निरीक्षक विद्यूल्लता चव्हाण, कर्मचारी बाबा शिर्के, दिलीप जोशी, अर्जून दिवेकर, मोहन साळवी, महेंद्र पवार, राहूल जोशी, मनोज साळुंके, विशाल शिंदे, अमित छडीदार, सचिन चंदन, प्रफुल्ल साबळे, योगेश मोहिते यांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. दोघांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

काही माथाड़ी युनीयनचे कामगार तेथील कंत्राटदारांना आमच्याकडूनच काम करून घ्यायचे तसेच सांगेल तोच दर द्यायचा अशा धमक्या देत असतील तर त्याबाबत गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.