इंदापूर वनविभागात वण्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – डाळज नंबर 3 (ता. इंदापूर) परिसरातील वनविभाग वनक्षेत्र हद्दीमध्ये दोन वागरी (जाळे) लावून वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन शिकार्‍यांचा प्रयत्न वन विभागाने उधळून लावला. व वनविभागात सापळा लावून बसलेल्या दोन शिकाऱ्यांना शिकारीचे साहित्यासह मोठ्या शिताफीने वन विभागाच्या कर्मचाऱ्याने ताब्यात घेतल्याची माहिती इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी इंदापूर येथे दिली.

याबाबत इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी माहीती देतांना सांगीतले की, इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत चारी क्रमांक तीन या वन क्षेत्रातील गट क्रमांक 192 – 2 मध्ये काही शिकार्‍यांनी वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने दोन फासे (वागर) लावल्याची खबर वनकर्मचार्‍यांना मिळाली होती. त्या अणूषंगाने त्याची शहनिशा करण्यासाठी आम्ही वनकर्मचारी स्टाफसह फासे लावलेल्या ठीकाणी धाव घेतली.

त्याठीकाणी सुनील संदिपान काळे (वय 29 राहणार डाळज नंबर 2. मुळ राहणार- घोडेगाव, तालुका- जामखेड, जिल्हा- अहमदनगर) व संजय गेनबा चव्हाण (वय 65 सध्या राहणार डाळज नंबर 2. मूळ राहणार इनामगाव, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे) हे त्याठिकाणी दबा धरून बसलेले दिसून आले. त्यांना विचारले असता त्यांनी ससे पकडण्यासाठी आल्याचे सांगितले. वन कर्मचाऱ्यांनी इतरत्र शोध घेतला असता त्याठिकाणी दोन फासे लावण्यात आल्याचे दिसुन आले. त्या दोघांना त्याच ठिकाणाहून ताब्यात घेतले असून यासाठी वनपाल पवन आहेर पार्टी इंगवले मधुकर आगलावे बंडू कुंभार यांनी ही कारवाई केली. आरोपिंना शिकारीच्या साहित्यासह ताब्यात घेण्यात आल्याची माहीती राहुल काळे यांनी दीली.

Visit : Policenama.com