PM मोदींच्या पुतणीची पर्स का चोरली ? माहिती झाल्यावर डोक्यालाच हात लावाल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स चोरणाऱ्या चोरटयांना अटक केली आहे. नोनु उर्फ गौरव याला 12 ऑक्टोबरच्या रात्री सोनिपत (हरियाणा) येथून अटक करण्यात आली आणि बादल उर्फ आकाश याला 13 ऑक्टोबरला सुल्तानपुरीवरून अटक करण्यात आली आहे.

हायप्रोफाईल केस असल्यामुळे या प्रकरणावर जवळजवळ 700 पोलीस अधीकारी काम करत होते. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी जवळजवळ दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा कुठे आरोपींचा शोध लागला आहे. सर्वसामान्यांच्या बाबतीत असे कधी होताना दिसत नाही. आरोपीने गुन्हा करताना ज्या गाडीचा वापर केला होता त्याने ती स्कुटी आपल्या सुल्तानपुरीच्या मावशीकडे ठेवली होती. पोलिसांनी ती दुचाकी ताब्यात घेतली आहे.

स्कूटी मौसी के यहां रखकर नोनू सोनीपत भाग गया था.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्स चोरल्यानंतर दोनीही आरोपी एका जवळच्या इमारतीपाशी थांबले, तेथे त्यांनी मालाची वाटणी केली आणि पर्समधील डॉक्युमेंट त्याच ठिकाणी फेकून दिले. त्यानंतर दोघेही सुल्तानपूरी येथे निघून गेले. नोनूने बादलला त्याच्या घरी सोडले आणि स्वतः आपल्या मावशीकडे थांबला.

पर्स चोरून दोघांनी नेमकं काय केलं ?

पोलिसांनी ज्यावेळी तपासणी केली त्यावेळी समजले की नोनूचा जन्म तिथल्याच एका बाजारात झाला होता. त्याच्या पालकांना व्यसनाची सवय होती. त्यामुळे त्याला सुद्धा व्यसन लागले. त्यानंतर नोनु सुल्तानपुरीमध्ये राहण्यासाठी निघून गेला तेथेच त्याची भेट बादल सोबत झाली. त्या दिवशी दोघांनाही नशा करण्यासाठी ड्रग्सची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी एक किलोमीटरपर्यंत दमयंती बेन यांचा पाठलाग केला आणि वेळ साधून पर्स पळवली आणि त्यानंतर ड्रग्सची खरेदी केली. त्यानंतर दोघेही घरी गेले, घरी गेल्यावर टिव्हीवरती बातमी पाहून नोनु ने बादलला कॉल केला, दोघांचे बोलणे झाले आणि नंतर फोन बंद केला. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा फोन वापरण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी फोन ट्रेस करून त्याला अटक केली.

फोन स्विच ऑफ करके बादल सुल्तानपुरी में छिपा हुआ था. अब गिरफ्तार कर लिया गया है.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनूला 16 वर्षांचा असताना एका साखळी चोरी संदर्भात पकडण्यात आले होते. त्याच्याविरोधात आणखीनही गुन्हे नोंदविलेले होते. पोलिसांनी दोन दिवसात या प्रकरणाचा छडा लावला आहे आणि आरोपीला अटक केली आहे.

मात्र यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात की, दिल्ली सरकारने लावलेल्या सीसीटीव्हींमुळे आरोपी तात्काळ सापडले. मात्र भाजपचे खासदार मनोज तिवारी म्हणतात की दिल्लीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांमुळे असे गुन्हे वाढत आहेत आणि अशांना रोखण्यासाठी दिल्लीमध्ये एनआरसी लागू करायला हवी.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी