रिक्षाची भरपाई मागून तरुणाला लुटणार्‍या दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला अडवून तुझ्यामुळे रिक्षा ठोकली आहे, भरपाई दे, अशी दमदाटी करुन त्याच्याकडील मोबाईल व रोकड जबरदस्तीने लुटणार्‍या दोघांना निगडी पोलिसांनी (Nigdi Police) अटक (arrested) केली आहे.

शिवा सुरेश यतनाळकर (वय २१, रा. दुर्गानगर, आकुर्डी) आणि प्रथमेश दिलीप कांबळे (वय १८, रा. यमुनानगर, निगडी) अशी अटक (arrested) केलेल्यांची नावे आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी दिनेश राजेंद्र कांबळे (वय २१, रा. यमुनानगर, निगडी) याने निगडी पोलीस (Nigdi Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिनेश कांबळे १२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निगडीतील दुर्गानगर झोपडपट्टी येथील दुर्गा चौकाजवळून पायी जात होते.
यावेळी रिक्षातून तिघे जण आले.
त्यांनी कांबळे याला अडवून तुझ्यामुळे त्यांची रिक्षा ठोकली आहे.
असे म्हणून रिक्षाची भरपाई ५ हजार रुपये दे, नाही तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.
त्याच्याकडील मोबाईल व १ हजार रुपये असा ८ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला.
निगडी पोलिसांनी दोघांना अटक (arrested) केली असून त्यांच्या एका साथीदाराचा शोध घेत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक लोखंडे अधिक तपास करीत आहेत़.

Web Title: Two arrested for robbing youth

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट