ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक : तब्बल ३९ लाखांचा ड्रग्ज जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे. अंधेरीच्या अंबोली पोलिस आणि अंमली पदार्थविरोधी पथकाने मंगळवारी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे. या कारवायांमध्ये कोकेन आणि एमडी असा तब्बल ३९ लाखांचा साठा जप्त केला आहे.

[amazon_link asins=’B07B6SN496,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0088905a-b0e1-11e8-902f-df38254653c7′]

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबोली परिसरात एक नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी अंधेरीच्या अंबोली पोलिस आणि अंमली पदार्थविरोधी पथकाने जोगेश्वरी पश्चिम येथील सहकार रॉड येथे सापळा रचला आणि अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या फेमी ओलूयंका ओपयेमी (२९) याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे ३७ लाख ७६ हजार रुपयांचे ४७२ ग्रॅम कोकेन सापडले. अंबोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून फेमीला अटक केली आहे.

इतकेच नव्हे तर दुसऱ्या कारवाईत अंमली पदार्थविरोधी पथकाने सलीम नवाब खान उर्फ सलीम तलवार याला ताब्यात घेतले. गस्तीवर असताना पट्ठे बापूराव मार्गावरील सहाव्या गल्लीत सलीम लपत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. पोलिसांनी सलीमला पकडले असता त्याच्याकडे एक लाख रुपयांचे एमडी सापडले.

या घटनेची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दया नायक यांना मिळाली असता वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सरगर आणि नायक तसेच अंमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटचे सहायक पोलिस निरीक्षक कदम आणि त्यांच्या पथकाने हि कारवाई केली.