मांडूळ विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मांडूळ जातीचा साप विक्रीसाठी आलेल्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून साप जप्त करून केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार त्याची किंमत २० लाख रुपये आहे.

ओंकार भानुदास पवार (वय-23 वर्षे रा. टिळेकर नगर गल्ली नं.07 कोंढवा बुद्रूक पुणे),  सद्दाम पैगंबर चमनुर (वय-18 रा.जगताप डेअरी मागे अप्पर बिबवेवाडी पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर डेपो परिसरात दोन जण अप्पर बस डेपो येथे मांडूळ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पुजारी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन सापळा रचला. त्यावेळी दोन जण तेथे संशयितरित्या दिसून आले. त्यापैकी एकाच्या हातामध्ये बारदाण्याचे पोतडे दिसल्याने पोलीसांनी त्यांना हटकले. त्यावेळी ते तेथून पळून जावू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.

त्यावेळी त्यांच्याकडील बारदाण्याच्या पोताडयात पाहणी केली तेव्हा त्यात एक मांडूळ जातीचा साप मिळून आला. त्याची आंतराष्ट्रीय बाजार भावानुसार 20 लाख रुपये आहे. तसेच एकाच्या कमरेत लपून ठेवलेली गुप्ती व लहान मुलांच्या खेळण्यातील 500 रुपयाच्या 100 नोटा व एकस्टील सारखे दिसणारे पिस्टल गॅस लायटर मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी ते जप्त केले. दोघांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा. हा साप त्यांना अर्जुन पवार नावाच्या व्यक्तीने विक्रीसाठी दिला असल्याचे सांगितले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनीयम सन 1972 च्या कलम 9,39,48(अ),51 , सह भारतीय हत्त्यार कायदा 4(25) अन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड,  सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे सहायक पोलीस निरीक्षक पावसे, कर्मचारी चिप्पा,  खुटवड, दुधाने, पुजारी, कुलकर्णी, लोधा, मोरे, शिंदे यांच्या पथकाने केली

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us