Pune News : टाकळी हाजी येथे गोळीबार करुन खुन करणारे दोघेजण गजाआड

शिरुर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी (Takali Haji) येथे एका तरुणावर गोळीबार करुन खुन केल्याची घटना घडली होती. दुचाकीवरुन आलेल्या काही मारेकऱ्यांनी भर चौकात स्वप्निल छगन सणसिंग (वय-30) याचा गोळ्या घालून खून केला. याप्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. हा खून वाळु व्यवसाय तसेच उसने पैशांच्या कारणावरुन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना सोमवारी (दि.18) दुपारी बाराच्या सुमारास घडली होती.

विजय उर्फ पप्पू उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (वय-25), आकाश उर्फ बबलू खंडु माशेरे (वय 24 दोघे रा.आमदाबाद, ता.शिरूर, जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी टाकळी हाजी येथील सर्कल कार्यालयासमोर होंडा शाईन मोटार सायकलवर येवून पिस्तुलामधून गोळया झाडुन स्वप्नील रणसिंग याचा खुन केला. खुन केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना पुणे-नगर हायवे रोड वरील शिक्रापूर-चाकण चौकातून अटक केली. आरोपींना शिरुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, नेताजी गंधारे,पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, दत्तात्रय गिरमकर, राजेंद्र थोरात, दत्तात्रय जगताप, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार विद्याधर निचित, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, विक्रम तापकीर, जनार्दन शेळके, काशिनाथ राजापुरे, प्रमोद नवले, राजू मोमीन, पोलीस नाईक मंगेश थिगळे, दिपक साबळे, पोलीस शिपाई संदीप वारे, अक्षय नवले, अक्षय जावळे, प्रसन्न घाडगे यांच्या पथकाने केली.