मौजमजेसाठी जबरी चोरी आणि वाहनचोरी करणाऱ्या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहर व परिसरातील वाहन चोरी, जबरी चोरी करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ दुचाकी व ३ मोबाईल असा ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देलमाल जप्त करण्यात आला आहे.

अक्षय रामराव सुतार (२१, फुरसुंगी), रोहित कृष्णा वासुदेव (२१, काळेपडळ हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ११ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वाहन चोरी , बसमधील चोरी, घरफोडी या गुन्ह्यांचा तपास हडपसर पोलीस करत होते. त्यावेळी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे सखोल तपास केल्यावर त्यांच्याकडून शहरातील अकरा गुन्हे उघडकिस आणले. त्यासोबतच सोन्याचे दागिने, ८ दुचाकी, ३ मोबाईल असा ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आय़ुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, प्रसाद लोणारे, कर्मचारी संपत औचरे, राजेश नवले, युसुफ पठाण, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, शिवले, सैदोबा भोजराज, राजू वेगरे, नितीन मुंढे, अकबर शेख, गोविंद चिवळे, शशिकांत नाळे यांच्या पथकाने केली.

ह्याहि बातम्या वाचा

सासवड येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

विखे – पाटील आणि मंत्री गिरीश महाजन एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईला रवाना ; राजकीय क्षेत्रात खळबळ

लोकसभा निवडणुकीच्या मध्यात पुलवामा सारखा हल्ला केला जाण्याची शक्यता

राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागारपदी डाॅ. संजय चाकणे यांची निवड

पाकमंत्र्याचे डोक फिरलं म्हणे ‘आर्मी कॅप’ घालून खेळणाऱ्या संघावर कारवाई करा !