तरुणाच्या अपहरण प्रकरणी दोघे अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – तीन लाखांसाठी तरुणाचे अपहरण करुन त्याला मारहाण करणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

ओंकार ज्ञानदेव वटाणे (24, रा. चिंचवड), असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंद्रकांत महादेव कांबळे (27, रा. लिंक रोड), अभिजित राजेंद्र इंगवले (24, रा. पिंपरी) या दोघांना अटक केली आहे. यशवंत ताडीवाल आणि अन्य एकजण अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार याचे चिंचवडमधील केसर हॉटेल समोरून अपहरण केले. त्याला जबरदस्तीने आरोपीने त्यांच्या मोटारीत बसवून नेले. ओंकारकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. ओंकार याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी त्याला हाताने मारहाण केली काही वेळेनंतर चिंचवड येथे सोडून दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून इतर फरार आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश अटवे, पोलीस कर्मचारी दत्ता गायकवाड, सुधाकर आवताडे, जयवंत राऊत, सचिन वेर्णेकर, अमोल माने, रुपाली पुरीगोसावी यांच्या पथकाने केली.