दरोडाच्या प्रयत्नातील दोघांना घातक हत्यारासह अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलीसांकडून अटक करण्यात आले आहे. ललीत गवळी, निलेश देसले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांना मंगळवारी पहाटे मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लळींग घाटातून घातक शस्त्रांसह गस्तीवरील पोलीसांकडून अटक करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस कर्मचारी तुषार जाधव, प्रकाश पावरा, चेतन माळी हे रात्रीच्या वेळी गस्ती पथकावर असताना त्यांना लळींग घाटात काही अज्ञात व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असताना आढळले. त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले असता ते ट्रक लुटून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजले. त्यांच्याकडून दोन मोदारसायकलसह घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डाॅ. राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी गस्तीवरील पथकाचे अभिनंदन केले. या पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

 

Loading...
You might also like