बिबट्याच्या कातड्याची तस्करी, दोघांना बेड्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. १८ लाखांमध्ये कातडीची विक्री करण्यासाठी हे दोघे आले होते. त्यावेळी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे.

राजेश अरोरा (४४, मुलूंड मुंबई), मोजीस उर्फ णोजा आगीमणी (३०, रा. तुमरी कप्पा, धारवाड, जि. कलकडगी कर्नाटक) अशी अटकत करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

वागळे इस्टेट परिसरात दोन जण बिबट्याचे कातडे विक्री करण्यासाठी दोघे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार आणि हवालदार शशिकांत नागपूरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने २१ मे रोजी अरोरा अगीमणी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे एका हिरव्या रंगाच्या सॅकमधून बिबट्यी कातडी आढळून आली. त्यानंतर त्यांच्याकडून १८ लाख रुपयांची कातडी जप्त करण्यात आली. दोघांनी ही कातडी कर्नाटकातून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

You might also like