दिघी परिसरात पिस्तूलासह दोघांना अटक

पिंपरी :  पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी खंडणी व दरोडा विरोधी पथकाने दिघी परिसरातून दोघांना अटक केली. या दोघांकडून ७५ हजार ६०० रुपयांचे दोन पिस्टल आणि ३ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि.७) भोसरी येथील दिघी मॅग्झिन चौकात करण्यात आली.
प्रतिक उर्फ पद्या प्रकाश तापकीर, वय २६, रा. म.फुले शाळेजवळ, भोसरी), किरण संजय कटके (वय २३, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दिघी मॅग्झिन चौकात दोन तरुणांकडे पिस्टल असल्याची माहिती खंडणी व दरोडा विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता प्रतिक याच्याकडून २५ हजार २०० रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. तर किरण याच्याकडून ५० हजार ४०० रुपयाचे पिस्टल आणि २ काडतुसे जप्त करण्यात आली.  या प्रकरणी त्यांच्याविरूद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की
पुणे :  वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोघांवर कारवाई करत असताना आरोपींनी बंडगार्डन वाहतूक विभागाचे सहायक पोलीस फौजदार एफ.अे. सॅमसन यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांना शिवीगाळ करुन धमकी दिली. एफ.अे. सॅमसन यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद शुभान नागोर (वय-२१ रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड), इक्बाल ख्वाँजा संगम (वय-३५) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.७) दुपारी एकच्या सुमारास आरटीओ चौकात घडली. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.
You might also like