2 मित्रांना झालं फिल्म ‘गुंडे’ सारखं प्रेम ! दोघेही एकाच महिलेबरोबर मुलं जन्माला घालण्यास तयार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ब्राझीलचे दोन बेस्ट फ्रेंड्स एकाच महिलेच्या प्रेमात आहेत आणि गेल्या दीड वर्षापासून हे तिघेजण एकमेकांना डेट करत आहेत. हे तिघेही पारंपारिक जोडप्यांप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये आणि डेट्सवर जातात. तथापि त्यांना लोकांच्या विचित्र प्रतिक्रियांना देखील सामोरे जावे लागते, परंतु हे तिघेही भविष्यासंदर्भात बरेच प्लॅन्स आखत आहेत.

30 वर्षीय डिनो डिसोझा आणि सॉलो गोम्स ब्राझीलचे असून गेल्या वर्षी स्पेनच्या बार्सिलोना येथे सुट्टीवर गेलेले असताना बेलारूसच्या एका बारमध्ये ते गेले होते. येथे या लोकांची भेट 27 वर्षीय ओल्गाशी झाली जी आपल्या मित्रांसोबत होती. डिनो आणि सॉलो यांनी सोबतच या महिलेस अ‍ॅप्रोच केले आणि तिघेही एकत्र डेटला जाऊ लागले.

याबद्दल बोलताना डिनोने म्हटले की- सॉलो आणि मी बार्सिलोना फुटबॉल सामना पाहण्यासाठी गेलो होतो आणि तिथे आम्हाला ओल्गा भेटली. आम्ही तिला ड्रिंकसाठी अ‍ॅप्रोच केले आणि आमची कहाणी येथून सुरू झाली. आम्ही तीन लोक रिलेशनशिपमध्ये आहोत ही बाब आमच्यासाठी अडचणीची नाही. आमची केमिस्ट्री आमच्यासाठी अधिक महत्वाची आहे. आमच्या तिघांमध्ये खूप स्ट्रॉंग केमिस्ट्री आहे.

डिनोने म्हटले की सुरुवातीला आम्हाला कुटुंबीय आणि मित्रांकडून अनेक प्रकारचे मॅसेजेस भेटत होते, त्यांना जाणून घ्यायचे होते की अखेर आमच्यात चालू तरी काय आहे, कारण ही परिस्थिती सामान्यपेक्षा थोडी वेगळी होती. आम्ही अगदी सहजतेने आमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना ओल्गाबद्दल सांगितले आणि यामुळे लोकांचे मत आमच्याप्रती बदलले आहेत आणि आता लोक खूपच आधार देत आहेत.

डिनो, ओल्गा आणि सॉलो हे गेल्या दीड वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि तिघेही सध्या फ्रान्समध्ये राहतात आणि त्यांना एकत्र मुले देखील जन्माला घालायची आहेत. डिनोने म्हटले की आम्हाला संपूर्ण जग फिरायचं आहे आणि आमचा व्यवसाय वाढवायचा आहे आणि अगदी सोप्या मार्गाने आयुष्य जगायचं आहे.