सेल्फीचा नाद जीवघेणाच…! धावत्या बाइकवर सेल्फी काढणाऱ्या दोन युवकांचा मृत्यू

दिल्ली: वृत्तसंस्था : सध्याच्या तरुणाईला सेल्फीचा खूपच  मोह आहे. या सेल्फीच्या मोहापायी अनेक अपघात झाल्याच्या घटना तुमही ऐकलया असतील. बोटीतून जाताना सेल्फी घेताना बोट बुडाली. घाटावर सेल्फी घेताना पाय घसरून अपघात घडलयाच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. आता दिल्ली येथील दोन तरुणांना धावत्या बाईकवर सेल्फी घेणे महागात पडले. धावत्या बाईकवरून सेल्फी घेताना बाइकवरील नियनटरं सुटले आणि बाइकवरील दोन्ही तरुणांचा यात मृत्यू झाला. ही  घटना दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर घडली आहे. दोघांची ओळख अजून पटली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

या दोन युवकांजवळ कोणतंच ओळखपत्र सापडलेलं नाही. हे दोघंही उत्तर दिल्लीतील उस्मानपुराचे रहिवाशी असल्याचं बोललं जातंय. हे दोघं आज सकाळी अत्यंत भरधाव वेगाने गाडी चालवत सिग्नेचर ब्रिजवरून जात होते. त्यावेळी त्यांनी बाइक वेगात असताना सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते आहे. यामुळेच त्यांची गाडी डिव्हायडरवर आपटली आणि ते खाली कोसळले. दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सध्या या दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘सेल्फी’ म्हणजे व्यसन

स्वत:च्याच प्रेमात पडून सतत सेल्फी काढण्याची ही सवय म्हणजे प्रत्यक्षात ‘सेल्फायटिस’ हा मानस‌िक आजार असल्याच्या निष्कर्षाप्रत वैद्यकशास्त्र आले आहे. याच आजाराचे टप्पेही निश्चित करण्यात आले असून, दिवसभरात पाच-सहा सेल्फी काढून अपलोड करण्याच्या सवयीला व्यसन म्हणून घोषित करण्याचा ‘वर्ल्ड सायकियाट्रिक असोस‌िएशन’चा विचार आहे.

मानसिक आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी सध्या मानसिक आजार सप्ताह पाळण्यात येत आहे. सध्याच्या युवा पिढीतील सेल्फीचे वेड म्हणजे मानस‌िक आजारच असल्याचा निष्कर्ष ‘अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन’ने (एपीए) काढला आहे. गेल्या महिन्यात ‘एपीए’ने या मानस‌िक आजाराचे वर्णन ‘सेल्फायटिस’ असे केले आहे. हे सर्व निष्कर्ष अमेरिकेतील सामाजिक व्यवस्थेवर आधारित असले तरी आपल्या देशातही परिस्थिती फारशी वेगळी नाही, असे जी. टी. हॉस्पिटलमधील मनसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात.

‘एपीए’ने घोषित केलेले आजाराचे टप्पे

पहिला : हा टप्पा म्हणजे या आजाराच्या सीमारेषेवर असलेली तरुणाई ही मंडळी दिवसभरात तीन वेळा सेल्फी काढतात, पण सोशल मीडियावर टाकत नाहीत.

दुसरा : हा टप्पा ‘अॅक्युट’ प्रकारात गणला जातो. दिवसभरात किमान तीन सेल्फी काढून ते सोशल मीडियावर टाकणारी ही मंडळी असतात.

तिसरा : हा टप्पा म्हणजे क्रॉनिक किंवा सिव्हिअर आजाराचे निदर्शक असतो. ही मंडळी दिवसभरात किमान सहा सेल्फी काढून ते फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअॅपवर अपलोड करतात. ते अनेकदा मानस‌िक ताणाखाली असतात. त्यांना मित्रमंडळी कमी असतात. कुटुंबासोबत संवादही तुटलेला असतो. त्याची भरपाई करण्यासाठी सोशल मीडियावर सतत सेल्फी टाकतात व या फोटोना खूप लाइक्स मिळाल्यावर त्यांना समाधान मिळते.