बीड : गेवराई परिसरातून 2 अट्टल दुचाकी चोर अटकेत, 7 दुचाकी जप्त

बीड (गेवराई) : पोलीसनामा ऑनलाइन – बीड, परळीसह इतर परजिल्ह्यामध्ये दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानीक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गेवराई परिसरात सोमवारी रात्री करण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किंमतीच्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत. बाळु महादेव मिंदर (वय-21), देविदास लिंबाजी पवार (वय-25 दोघे रा. जातेगाव, ता. गेवराई जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक करण्यात आरोपींनी परळीसह इतर तालुके आणि परजिल्ह्यातून साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपी हे त्यांच्या इतर साथिदारांच्या मदतीने चोरलेल्या दुचाकी फायनान्सच्या असल्याचे सांगून जातेगाव या ठिकाणी विक्री करत होते. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकला मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरल्याचा संशय असून आणखी गुन्हे उघडकीस येणाची शक्याता पोलिसांनी वर्तवली आहे.

आरोपींना पुढील तपासासाठी परळी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय गोसावी, पोलीस कर्मचारी तुळशीराम जगताप, जयसिंग वाघ, भास्कर केंद्र, विकास वाघमारे, कैलास ठोंबरे, सतिष कातखडे, चालक हारके, वंजारे हरळे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like