जेजुरी परिसरात आढळले दोन मृतदेह

पोलीसनामा ऑनलाईन –  (चंद्रकांत चौंडकर) : जेजुरी शहरात साकुर्डे गावाकडे जाणाऱ्या रोडवर एक बेवारस मयत मिळुन आले असुन त्याचे वय अंदाजे ८० ते ८५ वर्षे असुन अंगात भगवे रंगाचे कपडे आहेत. डोक्यात काळे व पांढरे केस आहेत.पांढरी दाडी असुन रंगाने काळा आहे. तसेच दुसरी एक बेवारस मयत एस टी स्टँड परिसरात मिळून आली असुन सदर मयताचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असून डोक्याचे व दाडीचे केस काळे लांब वाढलेले असून रंगाने काळा आहे.

सदर दोन्ही मयत इसम हे भिकारी व फिरते होते.सदर मयत इसमची ओळख पटविण्याकामी त्यांच्या विषयी कोणाला काही माहिती असल्यास जेजुरी पोलीस स्टेशनच्या ९४२०८२७००१ व ०२११५२५३१२९ या क्रमांकवर संपर्क करण्याचे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक ए.एस.माने यांनी केले आहे.