धक्कदायक ! जेल मधून बाहेर पडले भावंड, गावात येताच गावकर्‍यांनी संपवलं

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनामुळे कारागृहात असलेल्या कैद्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आसाममधील कोरोना संसर्गामुळे तुरुंगात असलेल्या दोन भावांची सुटका करण्यात आली होती. मात्र, गावात पोहोचल्यावर किरकोळ प्रकरणावरून स्थानिक लोकांशी त्यांचे भांडण झाले. शाब्दिक वाद इतका वाढला की, ग्रामस्थांनी या दोन भावांचा हाणामारीत थेट खून केला. ही घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बकसा जिल्ह्यातील सिमुलगुरी जवळील अतिबरी गावात दोन्ही भावडांचा खून करण्यात आला आहे. बकसा जिल्ह्यातील एसपी थुब प्रितीक विजय कुमार यांनी सांगितले की, खेड्यातील दुश्मनीचे प्रकरणावरुन दोन्ही भाऊ या गुन्ह्यात सामील होते. पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे आणि बाकीच्यांना अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे. या घटनेत ठार झालेल्या भावांची ओळख विश्व पोलिसांनी बिश्वजित दास आणि हरधन दास अशी केली आहे. देशात कोरोना संक्रमणामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना काही कैद्यांना काही काळासाठी सोडण्याची सूचना केली होती. जेणेकरून तुरूंगातील कैद्यांची संख्या कमी होईल, तसेच संक्रमणाचा धोकाही कमी होईल. त्यामुळेच या दोन्ही भावांना देखील घरी सोडण्यात आले होते.

दोन्ही भाऊ दरोडे व खंडणी प्रकरणात अडकले होते आणि बरेच महिने तुरूंगात होते. तुरूंगातून सुटका झाल्यानंतर हे दोन्ही भाऊ एका नातेवाईकाच्या घरी राहत होते. बुधवारी सकाळी ते आपल्या पूर्वजच्या गावी परत आले. त्या दरम्यान त्यांच्यात आणि गावकर्‍यांमध्ये एका गोष्टीवरून भांडण झाले. हा वाद इतका वाढला की गावकर्‍यांनी त्यांना ठार मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येमागील खरं कारण अद्याप समजू शकलेले नाही. या हत्येबाबत गोबरधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.