कारवाई दरम्यान २ भावांकडून पोलीस उपनिरीक्षकास मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुकानासमोरील अनधिकृत बॅनर काढण्यावरून पालिका कर्मचाऱ्यांसोबत सुरु असलेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकास दोन भावांनी मारहाण केली. हा प्रकार आज दुपारी भवानी पेठेत घडला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून दोन भावांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.

प्रज्वल राजेन्द्र बनकर (वय ३५), दिगंत राजेन्द्र बनकर (वय ३०, दोघेही रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांनी फिर्याद दिली. प्रज्वल आणि दिगंत यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपकीकरण करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेतील अनधिकृत फ्लेक्स, बॅनरवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दुपारी बाराच्या सुमरास कारवाई करण्यासाठी गेले होते. भवानी हार्डवेअर या दुकानावर लावलेले अनधिकृत बॅनर अतिक्रमण विभगाचे कर्मचारी काढत होते. त्यावेळी प्रज्वल आणि दिगंत यांनी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांना बॅनर काढण्यापासून रोखले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व बीट मार्शल पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी त्याच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना दोन भावांनी गणेश माने यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

दाभोलकर, पानसरे यांची हत्या म्हणजे मतभेदाचा ‘आवाज’ बंद करण्यासाठी केलेले कृत्य – न्यायालय

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

 …तर तुमचही नावं स्मारकं, रस्ते, शाळा, विद्यापीठ, रुग्णालयं, विमानतळांना देता येईल

Loading...
You might also like