अहमदाबादमध्ये 2 भावांनी आपल्या 4 मुलांना मारून केली आत्महत्या, कुटुंबातील 6 जणांच्या मृत्यूमुळे खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन भावांसह चार मुलांचे मृतदेह येथे सापडले आहेत. पोलिसांना आत्महत्येची भीती असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व सहा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविले. संपूर्ण प्रकरण अहमदाबादच्या वाटवा भागातील आहे. येथील विंजोल परिसरातील प्रयोसा आर्पमेंटमध्ये गुरुवारी एका कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह सापडले. गौरांग पटेल आणि त्याचा भाऊ अमरीश पटेल यांच्यासह मयूर, कीर्ती, ध्रुव आणि सानवी अशी 4 मुले अशी मृतांची नावे आहेत. हे दोन्ही भाऊ कपड्यांच्या दुकानात काम करत असल्याचे समजते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी दोन्ही भाऊ मुलांना गाडीमध्ये फिरविण्यासाठी घराबाहेर घेऊन गेले. यानंतर ते त्यांच्याच परिसरातील दुसर्‍या घरात पोहोचले. सुमारे दोन अडीच वर्षांपूर्वी दोन्ही भावांनी हा फ्लॅट घेतला होता. जेव्हा ते घरी परतले नाही, तेव्हा कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. कुटुंबीय त्यांचा शोध घेत जेव्हा प्रयोसा आर्ममेंटवर पोहोचले तेव्हा त्यांना घर आतून बंद असल्याचे आढळले. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले आणि दार उघडल्यावर पोलिसांना सहा मृतदेह सापडले.

डीसीपी बिपिन अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरांग पटेल आणि त्याचा भाऊ अमरीश पटेल यांना प्रत्येकी दोन मुले होती. 17 तारखेच्या रात्री दोन्ही भाऊ चार मुलांना फिरायला घेऊन जात आहोत असे सांगून घराबाहेर पडले. तेव्हापासून ते बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल उचलला नाही. अशा परिस्थितीत हे कुटुंब दुसर्‍या फ्लॅटचा शोध घेत 18 रोजी रात्री जसोदा नगर येथे पोहोचले. फ्लॅट आतून लॉक होता. बर्‍याच प्रयत्नांनंतर जेव्हा हा फ्लॅट उघडला नाही, तेव्हा रात्री उशिरा कुटुंबियांनी पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना प्रकरण कळवले. माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडत फ्लॅटमध्ये आत जाताच पोलिसांना दोन्ही भावांचे मृतदेह टांगलेले होते. यासह चार मुलांचा मृतदेह सापडला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. पोस्टमोर्टम अहवालाच्या आधारे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही भावांनी मुलांना विष प्राशन करून आत्महत्या केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.