घराला लागलेल्या आगीत दोन भावंडांचा मृत्यू

राजापूर : पोलीसनामा ऑनलाईन 

घराला लागलेल्या आगीत होरपळून दोन भावंडांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील साखरीनाटे येथे घडली. फातिमा मुदस्सर दर्वेश (५) आणि नुमिर मुदस्सर दर्वेश (वय ७) अशी मरण पावलेल्या भावंडांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेचा जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने ताजुद्दीन अब्दुल हमीद तमके यांचा रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb1a5b93-c5fb-11e8-bb24-d7e2473806b1′]

एक ते दोन तासाच्या कालावधीतील अथक परिश्रमानंतर साखरीनाटे ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दर्वेश यांचे संपूर्ण घर त्यामध्ये जळून खाक झाले होते. शेजारच्या घरामध्ये कार्यक्रम असल्याने रात्री मुदस्सर फातिमा आणि नुमिर या दोन्ही मुलांना घरामध्ये झोपवून पत्नीसह शेजारच्या घरामध्ये गेले होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने परतीचा पाऊस पडत असल्याने साखरीनाटे येथे गेलेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे घरामध्ये उजेडासाठी मेणबत्ती पेटवून ठेवली होती. पेटविलेली मेणबत्ती वितळली आणि खाली अंथरुणावर पडल्याने अंथरुणाने पेट घेतला आणि आग लागली. या आगीमध्ये मुदस्सर यांचा घरातच टेलरिंगचा व्यवसाय असल्याने घरामध्ये मोठ्या प्रमाणात कपडे होते. त्यांनीही पेट घेतला आणि आग मोठ्या प्रमाणात पसरली.

कर्जबाजारी आयएलएफएसवरून काँग्रेस व भाजपमध्ये पुन्हा जुंपली

आग विझविण्यासाठी लोकांची धावपळ आणि आरडाओरड सुरू होती. घराभोवती दाटीवाटीने घर असल्याने आग भीषण रूप घेऊन मोहल्ल्यामध्ये आग पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे साखरीनाटे ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले. त्यातून सुमारे दीड तासाच्या कालावधीनंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. या साऱ्या धावपळीमध्ये घरामध्ये मुदस्सरची दोन्ही मुले अडकून पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. या घटनेचा जबर मानसिक धक्का बसलेले मुदस्सरचे मित्रा ताजुद्दीन अब्दुल हमीद तमके यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6dcd9fe2-c5fd-11e8-bbef-8701184a9940′]
 

आठ वर्षांच्या नुमिर साखरीनाटे येथील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तर, पाच वर्षांची फातिमा फिशरीज हायस्कूलमध्ये केजीत शिकत होती. टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या मुदस्सर दर्वेश यांना मच्छी विक्री व्यवसाय करून त्यांनी पत्नी त्यांना कुटुंबाला हातभार लावत होती.

मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही : शरद पवार

जाहीरात