दिवसाढवळ्या पत्रकार आणि त्याच्या सख्ख्या भावाचा गोळ्या झाडून खून

सहारनपूर (उत्तर प्रदेश): वृत्तसंस्था – पत्रकार आणि त्याच्या सख्ख्या भावाचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात आज (रविवार) सकाळी घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहारनपूर जिल्ह्यातील कोतवाली परिसरात किरकोळ कारणावरून हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सहारनपूर जिल्ह्यातील कोतलवाली परिसरामध्ये राहणाऱे पत्रकार आशीष आणि त्यांचा भाऊ या दोघांचे गावातील एका व्यक्तीसोबत जमीनीचे वाद होते. या वादातून आज सकाळी दहाच्या सुमारास दोघांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. दोघांना गोळी मारल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मयत आशिष हे मेरठ येथील एका वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून काम करत होते.

पोलिसांनी दोन्ही भावांना जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. दरम्यान, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. मात्र अद्याप आरोपींचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमीक तपसात दोघांचा खून जमीनीच्या वादातून करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like