मोटारीत गुदमरल्याने 2 सख्ख्या भावांनी गमावला जीव

पोलिसनामा ऑनलाईन टीम – महाडमध्ये भंगाराच्या गोडाऊन शेजारी उभ्या असलेल्या मोटारी(Car)त बसलेल्या दोन चिमुरड्या सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नागंलवाडी फाट्यावर भंगार वाल्याने भंगारात विकत घेतलेल्या कार(Car) चे दरवाजे अ‍ॅटोलॉक झाल्यामुळे ही घटना घडली आहे. सुहेल खान वय वर्ष 6 आणि अब्बास खान वय वर्ष 4 अशी मृत्यमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

सुहेल आणि अब्बास काल संध्याकाळी खेळताना गाडीत बसले होते. खेळताना गाडीचा दरवाजा बंद झाला. त्यामुळे लहानग्यांना दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे गुदमरून दोघांनी जीव गमावला, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहेत. याबाबत महाड औद्योगिक वसाहत पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. घटनेमुळे लहान मुलांकडे पालकांनी लक्ष देण्याची किती आवश्यकता आहे, हे अधोरेखित झाले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like