J & K : ‘इंटरनेट’ बंद असताना फुटीरतावादी नेते सय्यद गिलानी यांचे ‘ट्विटर’ अकाऊंट सुरु ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. असे असताना फुटीरतावादी नेते सय्यद अली शाब गिलानी याचे ट्विटर अकाऊंट सुरु आहे. अशी धक्कादायक बाब आता पुढे आली आहे. बीएसएनएलने याची चौकशी केल्यानंतर दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

इंटरनेट बंद असताना कसा मिळाला अ‍ॅक्सेस –
सोशल मिडियावर कोणत्याही अफवा पसरु नये याची दखल घेऊन सरकारकडून जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. असे असताना गिलानी यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट होत आहेत. इंटरनेट बंद असताना देखील त्यांनी इंटरनेटचा अ‍ॅक्सेस देणाऱ्या बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. असे असले तरी इंटरनेटचा अ‍ॅक्सेस दिला की, नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. ट्विट होत असलेले अकाऊंट देखील अधिकृत आहे की, नाही याचा तपास करण्यात येत आहे. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सतत देश विरोधी ट्विट करण्यात येत आहे.

आता तपास करण्यात येत आहे की, गिलानी यांना हा अ‍ॅक्सेस कोणाकडून देण्यात येत होता. 4 ऑगस्टपासूनच या ट्विटर हॅडेलवरुन अनेक वादग्रस्त ट्विट करण्यात आले आहे. सध्या काश्मीरमध्ये फक्त लँडलाईन फोनची सेवा उपलब्ध आहे. परंतू सध्या या प्रकरणी संशयित दोन बीेएसएनलच्या अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. आता प्रशासनाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त-