काय सांगता ! होय, 2 गर्भश्रीमंतांच्या मुलांकडे सापडल्या महिलांसोबतच्या ‘तसल्या’ 182 ‘क्लिप्स’

कोलकत्ता : वृत्तसंस्था – वेगवेगळ्या महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवून त्यावेळचा व्हिडीओ तयार करून महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना कोलकता पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन हे दोन युवक महिलांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अटक केलेले दोन युवक कोलकत्ता येथील नावजलेल्या दोन औद्योगिक घराण्यातील आहेत. या प्रकरणात एका आचाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. तो या औद्योगिक कुटुंबामध्ये स्वयंपाक करण्याचे काम करत होता. हे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

पोलिसांनी मागील तीन महिन्याच्या तपासामध्ये त्यांच्याकडे 182 महिलांचे व्हिडीओ सापडले आहे. तिन्ही आरोपींना गुरुवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने पुढील गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका कुटुंबाने त्यांच्या मुलाला या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या कुटुबाने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, सहाय्यक पोलीस आयुक्त मुरलीधर शर्मा यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

महिलांना असे ओढत होते जाळ्यात
दोन्ही आरोपी महिलांसोबत प्रेमाचे नाटक करून आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यानंतर त्यांच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापीत करून त्या क्षणाचा व्हिडीओ शूटिंग करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी एकाचा लॅपटॉप फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला आहे. यामध्ये एका फाईलमध्ये 182 फोल्डर सापडले आहेत. वेगवेगळ्या महिलांसोबत शारिरीक संबध ठेवतानाचे व्हिडीओ यामध्ये आहेत. या फोल्डरमध्ये 2013 पासूनच्या व्हिडीओ क्लिप्स आहेत. आरोपींनी मागील वर्षात आचाऱ्याला या कटामध्ये सहभागी करून घेतले होते. तो संबंधीत महिलेकडे पैशांची मागणी करत होता. पैसे दिले नाही तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता, असे पोलिसांनी सांगितले.

असे करत होते शुटिंग
आरोपी आधी महिलांसोबत ओळख करून घेत होते. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेत होते. त्या ठिकाणी पूर्वीच शूटिंगसाठी कॅमेरे सेट करून ठवलेले असायचे. मागील वर्षापासून या दोघांनी महिलांना व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली होती. आरोपींनी एका मुलीकडे सुरुवातीला पाच लाख रुपये मागितले होते. मुलीने पैसे दिल्यानंतर त्यांनी पुन्हा तिच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. अखेर या मुलीने सायबर सेलकडे याप्रकरणाची तक्रार केली त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला.