पेशवे तलावात बुडून २ चिमुकल्यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जेजुरी येथील पेशवे तलावातील खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (रविवार) दुपारी घडली आहे. आदर्श मनोहर उबाळे (वय ७, रा. जुनी जेजुरी) आणि आदित्य संभाजी कोळी (वय ८, सध्या रा. जुनी जेजुरी, मूळगाव देवळाली, ता. कळंब, जि उस्मानाबाद) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श हा पहिलीमध्ये तर आदित्य हा तिसरीमध्ये शिकत होता. हे दोघेही जुन्या जेजुरी परिसरात राहत असून घराजवळ असलेल्या पेशवे तलावाजवळ आज सकाळी खेळण्यासाठी गेले होते. बराच वेळ झाला तरी मुले घरी आले नसल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध घेतला. मुले तलावातील मैदानावर खेळण्यासाठी जात असल्याने त्यांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी त्यांना एका डबक्याजवळ मुलांचे कपडे दिसले.

मुले डबक्यात बुडाली असल्याचा संशय आल्याने स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने डबक्यातील पाण्यात दोघांचा शोध घेतला. स्थानिक नागरिकांनी दोघांना पाण्यातून बाहेर काढून तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषीत केले. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश दाभाडे करीत आहेत.

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

 कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !