अहमदनगर : पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर तालुक्यातील अरणगाव येथे जांभळे खाण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आज दुपारी चार वाजता ही घटना घडली आहे.

आदित्य मारूती मोरे (वय १०), अनुज दत्तात्रेय मोरे (वय १३) ही मयतांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, सुट्टी असल्यामुळे मोरे परिवारातील तिघे जण जांभळे खाण्यासाठी गेले होते. त्यांची पाण्याची बाटली शेजारीच असलेल्या शेततळ्यात पडली. बाटली काढण्यासाठी आदित्य व अनुज शेततळ्यात उतरले. पाणी जास्त होते. त्यांच्यासोबत असणारा ७ वर्षाचा मुलगा घाबरल्याने तो घरी पळून घरी गेला.

दोन लहान मुले घरातून बाहेर गेली. परंतु बराच वेळानंतर ती घरी न परतल्याने काही वेळाने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यांनी छोट्या मुलाला विचारले असता, तो नातेवाईकांना घेऊन शेततळ्यावर गेला. तोपर्यंत शेततळ्यात पडलेल्या दोन मुलांचा मृत्यू झालेला होता. ग्रामस्थांनी त्यांना शेततळ्यातून बाहेर काढून तातडीने दवाखान्यात हलविले. डॉक्टरांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सिने जगत –

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like