दोन चिमुरड्यांचा तळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – बांधकामासाठी खोदलेल्या तळ्यामध्ये दोन चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) सायंकाळी उघडकीस आली. ही घटना सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे घडली.

सोहम म्हस्के (वय-२) आणि मंथन मस्के (वय-४) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. या दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोहम आणि मंथन हे दोघे बांधकामासाठी खोदलेल्या तळ्याजवळ खेळत होते. खेळत असताना ते तळ्याजवळ गेले असता तोल जाऊन ते पाण्यात पडले. त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुले दिसत नसल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना तळ्यामध्ये त्यांचे मृतदेह आढळून आले. मुलांचे मृतदेह पाहताच पालकांनी हंबरडा फोडला. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

पोहायला शिकताना चिमुरड्याचा मृत्यू

कोरेगाव/पळशी : विहिरीत वडिलांसमवेत पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोरेगाव येथे घडली. पाठीवरील बांधलेला कॅन सुटल्याने आठ वर्षांच्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागले आहेत. वेदांत दीपक सोनावणे (वय 8, रा. भगवा चौक, कोरेगाव) असे या चिमुरड्याचे नाव आहे.