दुर्दैवी : छठ पुजेदरम्यान चेंगराचेंगरी, 2 मुलांचा मृत्यू

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमधील औरंगाबादमध्ये छठ पुजाचा कार्यक्रम सुरु असताना गोंधळ उडून चेंगराचेंंगरी झाली. या घटनेत दोन मुलाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना देव प्रखंड मुख्यालयाजवळील सूर्यकुंड येथे घडली आहे. या चेंगराचेंगरीत बिहटा येथील एका ६ वर्षाचा मुलगा तर दुसरी दीड वर्षाची भोजपूरच्या सहार येथील मुलीचा मृत्यू झाला आहे.

देशभरात शनिवारी छठ पुजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नदी, तलाव, सम्रुद किनाऱ्यांवर आयोजित केलेल्या या कार्यक्रमात लाखो भाविक सहभागी झाले होते. औरंगाबाद येथील सूर्यकुंड येथेही छठ पुजेसाठी हजारो भाविक जमले होते. मात्र काही वेळाने त्यांच्या गोंधळ उडाला. लोकांची धावपळ सुरु झाली. त्यात चेंगराचेंगरी होऊन दोन बालकांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरीत खाली पडून अनेक जण लोकांच्या पायाखाली तुडवले गेले. मात्र, अचानक ही चेंगराचेंगरी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अधिक गर्दी झाल्यामुळे गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या