धक्कादायक … आईने मुलांना विष पाजून केली आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – परळ येथील बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या १६ आणि ४ वर्षाच्या मुलांना विष पाजून गळफास घेऊन आत्महत्या केली.

रेवती कामेकर (वय-३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रेवती यांना मायग्रेनचा त्रास होता. याच त्रासाला कंटाळून तिने सिलिंग पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

पोलिसांनी घरात प्रवेश केला असता रेवती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. तर त्यांची दोन मुले मृत अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भरधाव बसखाली महिलेचे दोन्ही पाय

भंडारा : भरधाव एसटी बसच्या चाकाखाली एका महिलेचे दोन्ही पाय चिरडल्याची घटना आज (बुधवारी) दुपारी घडली. साकोली तालुक्यातील एकोडी येथे सत्यभामा बारकू मेश्राम (वय-६०) ही महिला रस्त्यावरून जात असताना बसखाली येऊन तिचे दोन्ही पाय गेले. तिला गंभीर अवस्थेत नागपूरकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.