Nashik News : पोलिस वडिल अन् सावत्र आईनं दिले चिमुकल्याच्या अंगावर चटके अन् केली मारहाण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सावत्र आई आणि वडिलांनी आपल्या दोन चिमुकल्यांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार नाशिकच्या (Nashik)  इगतपुरी येथे घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सावत्र आई आणि वडीलांना अटक केली आहे. आरोपी वडील रेल्वे पोलीस दलात कार्यरत आहे. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर आरोपी वडीलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईने आणि वडीलांनी मुलांचा दररोज छळ केल्याची माहिती मामानं पोलिसांना दिली. सध्या दोन्ही मुलांवर नाशिकच्या (Nashik) जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शहरातील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेतील आरोपी राहुल मोरे हे स्वत: रेल्वे पोलीस कर्मचारी आहे. ते आपली दुसरी पत्नी आणि पहिल्या पत्नीच्या दोन मुलांसोबत राहतात. दोन्ही मुलं लहान असून एक 5 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाचा मुलगा आहे. या दोघांना सावत्र आई आणि वडील चटके देऊन मराहण करतात.

दोन्ही मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोक जमा झाले आणि त्यांनी हा प्रकार मुलांच्या मामाला सांगितला. मुलांचा मामा सुरतहून या ठिकाणी आला आणि त्याने मुलांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याने वडील आणि सावत्र आई विरोधात फिर्याद दिली. मामाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुलांच्या आई-वडीलांना अटक केली. या दोघांवर मुलांचा छळ करत मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.