मोबाईलशी खेळताना बॅटरीचा स्फोट ; २ मुलं जखमी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – येथील एका गावात सकाळी मोबाईलशी खेळत असताना त्याच्या बॅटरीचा स्फोट होऊन त्यात दोन मुले जखमी झाले आहेत.

शिरुर या गावात सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. कृष्णा जाधव व त्याचा भाऊ कार्तिक जाधव (वय ५) असे जखमी झालेल्या दोन्ही मुलांची नावे आहेत. त्यांना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर व हाताला भाजल्याने जखमा झाल्या आहेत.

आज सकाळी कृष्णा व कार्तिक जाधव हे दोघे मोबाईलवर खेळत होते. यावेळी अचानक मोबाईलच्या बॅटरीने पेट घेतला. त्यात दोघे जखमी झाले. त्यांच्यावर प्रथम शिरुरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन त्यानंतर घाटी रुग्णालयात आणण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like