राष्ट्रवादीच्या ‘त्या’ दोन्ही बालेकिल्ल्यांना खिंडार पाडा : चंद्रकांत पाटील

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार असला तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वत: उमेदवार असल्याचे ठरवून काम करा. सातारा आणि माढा या राष्ट्रवादीच्या दोन्ही बालेकिल्ल्यांना खिंडार पाडा. अशी सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातारा येथे सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यावेळी, खासदार हा लोकसभेत लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी असतो. पण साताऱ्यात तसे होताना दिसून येत नाही. याचा विचार आता नागरिकांनीच करण्याची गरज आहे. सातारा मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार असला तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वत: उमेदवार असल्याचे ठरवून काम करा. सातारा आणि माढा या राष्ट्रवादीच्या दोन्ही बालेकिल्ल्यांना खिंडार पडायची आहे असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, केंद्रात भाजपचेच सरकार येणार आहे. त्यामुळे युतीचाच उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचनाही त्यांनी दिल्या. याचबरोबर मंत्री पाटील यांनी रात्रीच्या सुमारासच साताऱ्यातील भाजपचे नगरसेवक असणाऱ्या धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, सागर पावशे, आशा पंडित, सिद्धी पवार, प्राची शहाणे यांच्या घरी भेट दिली. यादरम्यान त्यांनी नागरिकांशीही संवाद साधला. तसेच रात्रीच्या सुमारासच साताऱ्यात दोन-तीन ठिकाणी गोपनीय बैठकाही घेतल्याची चर्चा आहे.