हैद्राबाद बॉम्बस्फोट प्रकरण : पुण्याचा रहिवासी आरोपी अकबराचा फैसला सोमवारी

हैदराबाद : वृत्तसंस्था
प्रतिनिधी : प्रेरणा परब – खोत

हैद्राबाद येथे २००७ साली साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. याप्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला आहे. यात आरोपी शफिक सईद आणि अकबर इस्माईल चौधरी यांना दोषी ठरविण्यात आले आहे. तर या प्रकरणातील इतर दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणाचा निकाल अद्याप कोर्टाने राखून ठेवला असून दोषींच्या शिक्षेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. याप्रकरणात दोघांना दोषी ठरविल्यामुळे या हल्ल्यातील पीडितांना तब्बल ११ वर्षांनी न्याय मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आरोपी अकबरचे पुणे कनेक्शन

दरम्यान, या प्रकरणातील दोषी ठरवलेला आरोपी अकबर चौधरी हा पुण्यातील आहे. त्याचे पूर्ण नाव मोहम्मद अकबर इस्माईल चौधरी असे आहे. तो कोंढव्यातील मिठानगर यथील रहिवासी आहे. त्याचे वडील मस्जिदीत कर्मचारी म्हणून काम करीत होते. इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक रियाज भटकळ आणि इकबाल भटकळ हे दोघे या स्फोटाचे मास्टरमाईंड होते. यातील रियाज भटकळ यांच्या आदेशावरून अकबर हैद्राबादला गेला होता. विशेष म्हणजे त्याच्याजवळ केवळ ६००० रुपये आणि एक मोबाईल होता ज्यात फक्त एकाचाच संपर्क क्रमांक होता. अकबर हा शाळेतून काढून देण्यात आलेला १० वी नापास विद्यार्थी होता. त्याच्या कुटुंबातील चार भावंड मधला हा दुसरा होता. आरोपी अकबरला २००८ साली गुजरात ए टी एस कडून अटक करण्यात आली होती.

असा घडला हैद्राबाद बॉम्ब स्फोटाचा प्लॅन

२००७ मध्ये करण्यात आलेल्या बॉम्ब स्फोटाची तयारी २००५ सालापासूनच करण्यात आली होती. हैद्राबाद येथे गेल्यानंतर अकबरने सर्वप्रथम मार्केटिंगचा जॉब सुरु केला त्यानंतर तो तिथे स्फोटाचा मास्टरमाइंड रियाजला भेटला.”रियाज ने मी सिव्हिल इंजिनिअर असून त्याला एक कोर्स करायचा आहे”. असे त्याने अकबरला प्रथमतः सांगितले होते. त्यानंतर दोघांनी हैद्राबाद येथे फॅब्रिकेशनचे काम करायला सुरुवात केली. त्यावेळी अकबरचे वय २६ वर्षे होते. अकबरचा भाऊ मोहसीन आणि रियाज भटकळ चा भाऊ इकबाल हे दोघे मित्र होते. अकबराचा भाऊ मोहसीन जो की २०१२ साली झालेल्या पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी आहे.

त्यानंतर या चौघांनी आपला एक गट तयार केला .त्यानंतर रियाज अकबरला कर्नाटकातील भटकळ यथे घेऊन गेला. तिथे त्याने अकबरची आणखी काही जणांशी ओळख करून दिली. कर्नाटकात त्यांनी एक आठवडा वास्तव्य केले. कर्नाटकातच अकबरची ओळख सुलतानशी करून दिली. त्यानंतर रियाज मुंबईला आला. कर्नाटकातील भेटीनंतर अकबरचे आयुष्य बदलून गेले.

कर्नाटकातून पुन्हा अकबर पुण्यात परतला . पुण्यातील कॅम्प परिसरात मध्ये तो अनीकला भेटला. अनीक त्या परिसरात अरेबिक भाषा शिकवत होता. या क्लासमध्ये आनीक ने आणखी काही लोकांशी अकबर ची ओळख करून दिली. त्यानंतर अनीक आणि अकबर हे दोघे एकत्रच राहत होते. आता २००५ ते २००७ या काळात अनीक आणि अकबर या दोघांच्यात आमूलाग्र बदल झाला होता.

बेंगलोरमध्ये देण्यात आले प्रशिक्षण

आता रियाज,अकबर आणि अनीक यांच्यासोबत ‘जिहाद’ सारख्या विषयांवर बोलत होता. त्यांतर हे सर्वजण पुण्याहून कर्नाटकातील भटकळला गेले. तिथे सुलतान नामक व्यक्तीने अकबर आणि आनीक यांचे ब्रेन वॉश करायला सुरुवात केली. पोलीस चौकशीदरम्यान अकबरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रियाजच्या आधिपत्याखाली २००७ मध्ये एक गट तयार केला. त्यानंतर त्या सर्वाना बेंगलोर येथे नेण्यात आले. बेंगलोर येथेच त्यांना बंदूक चालवणे, बॉम्ब तयार करणे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

… आणि ते पार्सल हैद्राबादला आणण्यात आले

त्यानंतर, चौधरीकडे एक पार्सल पाठवण्यात आले. सूचना आल्याशिवाय आजिबात पार्सल उघडायचे नाही अशी सक्त ताकीद देखील करण्यात आली होती. त्यानंतर रियाजने अनीकला खोट्या नावाने हैदराबादेत घर घेण्यास सांगितले. त्यानंतर चौधरीला पुण्यातून ६००० आणि एका मोबाईल सह हैद्राबादला बोलावण्यात आले. या मोबाईल मध्ये फक्त अनीक चा एकट्याचाच मोबाईल नंबर सेव्ह केला गेला होता. पुण्यातून आल्यानंतर हैदराबादेत रियाजने अकबरला कॉम्पुटर कोर्सचे प्रशिक्षण घेण्यास सांगितले होते.

हैद्राबाद बॉम्ब ब्लास्टच्या १५ दिवस आधी त्या परिसराची रेकी करण्यात आली. बॉम्ब ब्लास्टच्या चार दिवस आधी ते पार्सल उघडण्यात आले , ज्यात सगळे स्फोटक पदार्थ होते. बॉम्ब जोडण्यात आले. त्यानंतर हैदराबादेतील गर्दीची ठिकाणे असलेले लुम्बिनी पार्क आणि गोकुळ चाट येथे बॉम्ब ठेवण्यात आले.

पुणे : ९६ लाख लुटीच्या प्रकरणात एपीआयसह पोलिसाला ३ वर्षाची शिक्षा

या स्फोटात ४२ नागरिकांचा जीव गेला होता, तर ५० पेक्षा जास्त जखमी झाले होते. हैदराबादच्या मध्यवर्ती कोटी परिसरात असलेल्या प्रसिद्ध गोकुळ चाट येथे पहिला स्फोट घडविण्यात आला होता. तर येथील पर्यटनस्थळ असलेल्या लुम्बिनी पार्क येथे दुसरा स्फोट घडवून आणला होता. तर स्फोटानंतर पोलिसांनी जिवंत स्फोटकेही हस्तगत केली होती. तब्बल ११ वर्षानंतर या स्फोटातील पीडितांना आज न्याय मिळाला आहे. याप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. त्यामध्ये दोघांना दोषी ठरविण्यात आले आहे. तर पुण्याचा रहिवासी असलेला आरोपी अकबर याच्या शिक्षेचा फैसला सोमवारी देण्यात येणार आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : कळसकर याला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी

[amazon_link asins=’B07CNQRZBW,B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’56dc15a1-b031-11e8-ac31-3f446499ee80′]