Coronavirus : लासलगाव मध्ये 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ

लासलगाव – नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूने हाहाकार उडवला आहे मंगळवारी उशिरा रात्री आलेल्या संशयित 79 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यात लासलगावतील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यात रुग्णांची संख्या 463 झाली.29 मार्च रोजी लासलगाव जवळच्या पिंपळगाव नजिक की या गावी पहिला करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली होती. मात्र त्यानंतर 40 दिवसांमध्ये लासलगाव मध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने लासलगाव करांची चिंता वाढली.

दरम्यान मंगळवारी रात्री दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे बुधवारपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा व शेतमालाचे लिलाव बंद ठेवण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली आहे

चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने लासलगाव येथील खाजगी डॉक्टर आणि नर्सचे मंगळवारी उशिरा रात्री कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लासलगावसह वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांचेच धाबे दणाणले आहे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लासलगाव, पिंपळगाव नजीक या गावात शंभर टक्के लॉक डाऊन करण्यात आले असून लासलगाव बाजार समितीत कांद्याची आलेली आवकेमुळे रस्त्यावर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली आहे ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक होतांना दिसत होते. खाजगी डॉक्टरच्या दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज द्वारे डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या ची यादी तयार करण्याचे काम दिवसभर सुरू होते.

शासनाने दुकाने खुली करण्याचा आदेश सोशल मीडियावर व्हायरल होतात दुकानदार मध्ये आनंदाचे वातावरण होते मात्र मंगळवारी रात्री दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संपूर्ण लासलगाव परिसरात कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे

– एकाच दिवसात जिल्ह्यात 79 संशियत्यांचे आवाहल पॉझिटिव्ह
– लासलगावात दोन पॉझिटिव्ह रुग्णात एक डॉक्टर ,एक नर्सचा समावेश
– हाय रिक्स आणि लो रिक्स संशियत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निघण्याची शक्यता
– आज पासून पुढील आदेशपर्यंत लासलगाव ,पिंपळगाव नजीक गाव शंभर टक्के लॉक डाऊन
– लासलगाव बाजार समिती कांदा लिलाव आज पासून बंद
– पोलिसांची वाहनधारकांनाची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगलीच दमछाक