जेजुरी परिसरातील 2 सराईत गुन्हेगार तडीपार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार १) चंड्या उर्फ म्हाळसाकांत भिमराव भालेराव वय, २८ वर्षे , २) सोन्या उर्फ योगश भिमराव भालेराव वय, ३० वर्षे (दोघे रा. आनंदनगर, जेजुरी,  ता . पुरंदर, जि. पुणे) यांचेवर दुखापत, रस्त्याने जाण्यास अडवणुक करणे, गर्दीमारामारी, विनयभंग, घरात घुसून मारहाण करणे, अवैद्य दारू विक्री करणे, जुगार / मटका चालवणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने व सदरचे गुन्हे हे टोळीने वारंवार करीत होते.

तसेच त्यांचे अवैद्य गुन्हेगारी कृत्यास आळा बसावा याकरीता त्याचे विरूध्द संदिप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडे हद्दपार (तडीपारीचा) प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी त्या दोघांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधी करीता हद्दपारीचा आदेश पारित केल्याने, त्यांना आज रोजी पुणे ग्रामीण जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधी करीता हद्दपार करण्यात आलेले आहे .

सदर कारवाई जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण, तसेच आण्णासाहेब जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग, सासवड यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार जेजुरी पोलीसांनी कारवाई केलेली आहे. जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील आणखी काही सराईत गुन्हेगारांना लवकरच तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती जेजुरी पोलीसांना दिली आहे .